प्रबोधनकार ठाकरे

माझ्या विचारांनवरती साचलेल्या अज्ञान रूपी धुळीला हटवण्याची सुरवात ही प्रबोधनकार ठाकरे यांनी केली:

यूट्यूब वर डॉ. नरेंद्र दाभोळकरांना आणि कॉ. गोविंद पानसरेंना ऐकताना सतत प्रबोधनकार ठाकरेंच्या लिहिलेल्या काही पुस्तकांचे संदर्भ येत होते आणि माझ्या डोक्यात प्रश्नांचा मारा सुरू झाला, माझ्या माहिती मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील ही एवढीच ओळख माझी, पण त्यांचे विचार या विचारवंतांच्या भाषणातून ऐकल्यावर राहावले नाही आणि त्यांनी लिहिलेली थोडी फार पुस्तक मागवली आणि वाचली ती म्हणजे:

 १) देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे

 २) हिंदू धर्माचे दिव्य

 ३) ज्वलंत समाज प्रबोधन

 ४) श्री संत गाडगेबाबा

 

 

व्हाट्सअप संस्कृती:

१ मे १९६० अर्थार्थ महाराष्ट्रदिन, कामगारदिन म्हणून साजरा होतो तो कसा तर WhatsApp वर स्टेटस ठेऊन आणि जर प्रायवेट कंपनी मध्ये काम करत असलेल्यांना सुट्टी मिळालीच तर फिरायला जाऊन कीवा घरी आराम करून, हे दिवस साजरे करणे जयंती पुण्यतिथी हे सगळे स्टेटस ठेऊन साजरे करणे, या गोष्टीलाच मुळीच माझा थोडा विरोध आहे, विरोध नाही म्हणता येणार पण पटत नाही आणि आता तर स्टेटस सोधायला पण नाही लागत कारण इकडून तिकडून ते आलेले असते मग काय सेव करा आणि ठेवा स्टेटसला आणि करा ग्रुप्स मध्ये फॉरवर्ड, या सगळ्या पासून मी काही वेगळा नहवतो मी सुद्धा हेच करत होतो पण जेव्हा पासून थोर समाजसेवकांना वाचतोय यूट्यूब वर त्यांचे विचार ऐकतोय तेव्हा पासून माझ्या विचाराणा एक नवीन दिशा मिळत आहे. स्टेटस ठेवा पण त्याच बरोबर जर त्या दिवसाचे काय महत्व आहे किती महात्म्यानी आपल्या जीवनाची आहुति दिली ज्यामुळे आजचा दिवस आपण साजरा करतो किवा त्या दिवासामुळे मिळणारे स्वातंत्र्य उपभोगतो, हे सर्व जर आपण वाचले आणि आपल्या मुलांना इतरांना ज्ञान वाटले तर खरंच आपला तो दिवस साजरा करण्याचा किवा स्मरण्याचा हेतु साध्य  होईल आणि खऱ्या अर्थाने त्या त्या महापुरुषांचे आपण कृतज्ञ राहुत,.

 

राजकीय खेळखंडोबा:

आजच्यादिवशी या थोर पुरुषांची माहिती जर थोड्या फार प्रमाणात लोकांनी वाचली तर सध्या चालू असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय खेळखंडोबा लोकांच्या लक्षात येईल, आपण नवीन पिढीने जर आपल्या येणाऱ्या पिढीला ह्यांच्या विचारांचा वारसा द्यावा असे वाटते आणि त्यासाठी स्टेटस फॉरवर्डच्या दुनियेतून बाहेर येऊन वाचाल तर वाचाल हे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, ज्याने करून कोणी ही व्यक्ति आपल्या रायकीय किवा सामाजिक फायद्यासाठी आपल्या अज्ञानाचा फायदा उचलणार नाही.

आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले दोन्ही शिवसेना आणि प्रबोधनकार यांचे विचार हे किती भिन्न आहेत हे त्यांचे पुस्तक देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे वाचल्यावर आला गमतीची  गोष्ट अशी की शिवसेना हे नाव सुद्धा यांनीच दिले, हे असे ज्वलंत आणि स्पष्ट व्यक्तव्य  करायची हिम्मत आता तरी कोणामध्ये  उरलेली क्वचितच आढळते.

मंदिरांचे व्यवस्थापन:

प्रबोधनकारांनी मंदिराच्या व्यवस्थापनावर टीका केली आहे. यात देवळातल्या  देवा बद्दल बोलताना ते असे बोलतात की पांच ते सहा हजार वर्षा पूर्वी देऊळ ही काही संकल्पनाच न्ह्वती वेद काळा पासून ते मंदिरांच्या उत्पत्ति पर्यंत हे सगळे देव राहत तरी कुठे होते त्यांना थंडी वाऱ्यान पासून त्रास होत न्हावता काय? बातम्यान मध्ये वाचले की राम मंदिरा मध्ये रामाला दुपारच्या वेळे मध्ये आराम करायला मिळावा म्हणून मंदिर प्रशासन दर्शन बंद ठेवतात, आज जर प्रबोधनकार असते तर काय बोलले असते यांचा नेम नाही ५१ वर्ष झाली त्यांना जाऊन पण अजून त्यांच्या विचारांना लोक पूर्ण पणे विसरले असे वाटते अरे त्यांचे वंशज त्यांना विसरले तर लोकांचे काय घेऊन बसलात

ईश्वरनिरपेक्षता:

त्यांच्या विचारांन मध्ये मंदिरा मध्ये चालू असलेल्या काकड माकड आरत्या आणि त्याच बरोबर त्या पाषाणाला पंच पकवानांचे ताट नेवेद्य म्हणून जेवढे वाढतो तेवढे मंदिरा बाहेरच्या एका भिकार्याला काही चिल्लर देऊन आपण सुखावतो जणू काही पुण्याचेच काम केले, तसेच देवाला चढवलेल्या जरीदार वस्त्रा पेक्षा बाहेर बसलेल्या गरिबांच्या गोणपाटाची काळजी तर सोडा पण नुसते हे लक्षात सुद्धा आले तरी पुरे.

गाडगे बाबांचे चरित्र:

गाडगे बाबां त्यांच्या कीर्तनातून सुद्धा हेच लोकांना सांगायचे के बाप्पानो जो तुमचा देव आहे त्याला स्वताहून जेवता येत नाही स्वताहून कपडे घालत येत नाहीत तो कसला देव त्याला देव नका मानू, देव देवळात नसतो. कष्टाच्या कमाई मधून आपल्याला जेवढे लागते तेवढे काढून गरजू लोकाना मदत कराल तर देव पावल्याची अनुभूति मिळेल, पण आजचे वातावरण बघितले तर वाटते लोक या सगळ्या विचारांना विसरून गाडगे महाराजांचीच मंदिरे बांधतात, आणि विचार दिले टाकून, सध्या लोकांना सगळे कसे सोपे सोपे लागते आला एखादा विडियो व्हाट्आप यूट्यूब वर तर एका मिनिटा मध्ये बघितला आणि केला ग्रह त्या गोष्टीचा याचाच फायदा सध्याचे राजकारणी करतायत, किंबहुना त्यांना ते खूप सोपे जात आहे म्हणून मी लोकांना एक छोटेसे आव्हाहण करू इच्छितो की वेळात वेळ काढून वाचा ज्ञान हे पुस्तका मध्ये आहे व्हातआप हा फक्त संपर्क साधण्याचे एक आधुनिक साहित्य आहे.